Header Ads Widget

Responsive Advertisement

ऐतिहासिक पत्रांचे ८४ प्रकार, माहिती करून घ्या येथे

ऐतिहासिक पत्रे म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेचा आरसा. ढोबळ मानाने कोणत्याही पत्रांचे दोन प्रकार पडतात

अ.) खाजगी पत्रे

ब.) सरकारी पत्रे

याखेरीज पत्र नक्की कोणत्या कारणास्तव लिहिले आहे त्यावरून त्याचे प्रकार पडतात.

इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी या पत्रांचे जे प्रकार दिले आहेत ते खालीलप्रमाणे आहेत.

ऐतिहासीक पत्रे- शिवाजी महाराज - संभाजी महाराज पत्रे


१. अभयपत्र - दहशतीनें परांगदा झालेल्यास परत आणण्याबद्दल लिहावयाचें ते


२. अमानत किंवा जतीपत्र - एक वादी भोगवटा करतो, दुसरा फिर्याद आला, सबब लिहिलें तें.


३. अर्जीइनामपत्र- नजर देऊन इनाम घेणें तें.


४. आमंत्रणपत्रिका - दरबारांत बोलाविलें ती.


५. आज्ञापत्र - छत्रपतीचें खुद्द पत्र तें.


६. इनामपत्र - धन्यांनी कृपा करून जमीन अगर गांव देणें त्याबद्दलचें.


७. कबजपत्र - कबजा दिल्हा तें.


शिवकालीन पत्रातील मजेशीर गोष्टी येथे वाचा


८. कबुलायत- ठराव करून लिहून घेणें ती.


९. कर्जरोखा- रिणकोनाम लिहून घेणें तो.


१०. करीना-बादी यांची हकीकत लिहून घेणें तो.


११. कुंकुमपत्र - लग्न - मुंजीचें पत्र तें.


१२. कुंठितपत्र – कलमाकलमास लबाडी दिसून आली सबब यापरतें बोलणें नाहीं म्हणोन लिहून घेणें तें.


१३. कौलनामा - रयतेस इस्ताबा देऊन लावणी अगर बसाइत करण्यासाठीं जें पत्र लिहून देणें तें.


१४. खरेदीपत्र - खरेदी जमीन वगैरे घेतलें तें.


१५. खोका - हुंडीवर भरपाई लेहून घेतली, ठिकाणीं हुंडीचा ऐवज पावला न पावला, चौकशी केली तरी दाखविणें तो.


१६. खोटपत्र - कलमा कलमाची पुरवणी पांढरमुखें झाली नाहीं. खोटा पडला. नंतर लिहून घेणें तें.


१७. गुन्हेगारी किंवा दंडपत्र- न्यायी खोटा झाला त्यापासोन द्रव्य घेणें त्याचें पत्र तें.


१८. जातकतबा किंवा मोकदमजामीनकतबा- जातीस जामीन मोकदमास घेणें तो.


१९. जातपत्र - आपण लिहून देणें तें.


२०. जन्म टिपण- जन्मतां केलें तें.


२१. जप्तीचिट्टी- जप्ती करविली ती.


संपूर्ण हिंदू कालगणना सोप्या भाषेत सजून घ्या


२२. जसीपत्र - एक वादी भोगवटा करतो, दुसरा फिर्याद आला, सबब लिहिलें तें.


२३. जाब - हुंडी गमावली पुन्हां लिहून घेणें तो.


२४. जामीनसाखळी - रयतेस एकमेकांस जामीन घेणें ती.


२५. जामीनी- ऐवज कुळाकडून येणें थकला, त्यास तगादा केला, सबब बोलावयास आला, तेव्हां त्याजपासोन खात्री घेणें ती.


२६. तकरीर- वाद्याचा लेख वाद्यास दाखवून त्याजवरी लेहून घेणें ती.


२७. तगीरपत्र - कामावरून काढणें तें.


२८. तच करेपत्र - महालीं कमाविसदारावरी पैका घेतल्याचा मुद्दा शाबीत करून तुफानदार आला, ज्याजपासोन निशा सरकारनें घेऊन कमा विसदार बोलावून आणून रुजुबात करबिली; सबब पत्र लेहून घेणें तें.


२९. तह- सरकारनें कोणताही जुजबी करार किंवा नियम केला तो.


३०. तहनामा - दोन राज्यांत नेमबंदी झाली तो.


३१. ताकीदपत्र- बखेडा जाला त्याविषयीं लिहिणें तें.


३२. थळपत्र - थळ नेमून दिल्हें, तेथें पंचाईत जाली, तें.


३३. दस्तक - हंशील माफ करणे जकातीचें तें.


३४. दंडपत्र- न्यायी खोटा झाला त्यापासोन द्रव्य घेणें त्याचें पत्र तें.


३५. दुमालपत्र- नवा अंमलदार आला, माजी अंमलदारापासोन इनामी वगैरे जाबसाल लेहून आणणें तें.


३६. निवाडपत्र- सरकारांत न्याय मिळाला तें.


३७. निशाचिट्टी- जमीदारापासून अगर कमाविसदारापासून ऐवजाची खातर घेणें ती.


३८. निशापत्र - जमीदार सामील करून कारकुन कमाविसदारांनी द्रव्य खादलें त्याजपासोन धणी घेणें, निशा घेणें तें.


३९. निशेदारी - वर नं. २५ मधील जामीनीला उगवणी ती. खताखालीं 'यासि उगवणीस धणी अमुक' पुढे गुंतवणें तसे लिहिणें.


४०. नेमोत्तरपत्र - वादीस थलींहून निरोप देतेसमर्थी पुन्हां यावयाची मुदत करून घ्यावी तें.


शिवकालीन पत्रातील सर्व प्रकारच्या कालगणना सोप्या भाषेत समजून घ्या


४१. पावती-ऐवज पावला म्हणून लिहून घेणें ती.


४२. पुरशिस - करीना व तकरीर यांतील कलमें एकमेकांची बोलणी विचारून लिहून घेणें ती.


४३. फारखती- खत गमावलें त्याची.


४४. बहालपत्र किंवा बक्षिसपत्र - 


४५. बक्षिसपत्र- बक्षिस दिल्हें तें.


४६. भाळपत्र - दिवा काढण्यास राजी झाला त्याचे मस्तकी उच्चारपत्र शीरी बांधतात तें.


४७. मनाचिट्टी- तगादा मना करणें ती किंवा बरातदार उठवून आणणें ती.


४८. मसालापत्र किंवा हुकमी रोखा- हुकूम मोडला अगर सालाबाद शिरस्त्याप्रमाणें न वर्तला तरी मसालापत्र लिहिणें तो.


४९. महजर- महालांत किंवा कसब्यांत पंचाईत किंवा मनसुबी जाली तो.


५०. माफीपत्र - अस्मानी म्हणजे पर्जन्य न पडला अथवा फार लागला व सुलतानी म्हणजे दग्यानीं लुटलें, त्याबद्दल सूट देणें तें.


५१. मुचलका- वादी यांचा परस्परें तंटा लेहून घेणें तो. ५२. मुदतबंदी मुदत करणें ती.


५३. मृत्युपत्र - मरणसमयीं लिहिलें तें.


५४. मोकदम जामीनकतथा- जातीस जामीन मोकदमास घेणें तो.


५५. मोजदादपत्र - अंमलावरी गेल्यावरी सरकारी जिनसा माजी मामलतदारापासोन घेणें तें.


५६. यजितपत्र - सर्वमतें खोटा झाला त्यापासोन लेहून घेणें तें.


५७. यादी - संस्थानिकांनीं हुजुर अर्ज करणें ती.


५८. राजीनामा- वादी याणीं खुषीनें लेहून दिल्हा तो.


५९. रोखा- करारमाफक तगादा व वरात करणें तो.


६०. लग्नचिट्टी- लमाचे वेळी लिहिली ती.


६१. बदणुक- पांढर, बलोते व भोंवरगांव मेळवून यांचे माथां इमान टाकून साक्ष पुसणे ती.


६२. वंशावळ - पिढ्यांतील नांवें लेहून घेणें ती.


६३. बाटेपत्र किंवा विभागपत्र - आपापसांत समजुतीनें वाटे झाले तें.


६४. वृत्तिपत्र- वृत्ति नेमून दिल्ही तें.


६५. सडीपत्र - महालींहून वाद्याचें वर्तमान लेहून आणणें तें.


६६. सनद - गांवावर किंवा महालावर मामलतदार किंवा कमाविसदार यांस लेहून देणें ती.


मोडी लिपी म्हणजे काय? येथे वाचा संपूर्ण माहिती


६७. समजपत्र- वाद न करितां समजुतीस आले तें.


६८. समापत्र - भाऊबंद वगैरे बतनभाऊ मेळवून घेणें एकदिल सारें होनें त्याचा ठराव करणें, तो केला तें.


६९. समलातपित्र - मदतीस बोलावणें तें.


७०. सरंजामपत्र- सरंजाम दिल्हा तें.


७१. सरकतनामा- सरकतीनें शेत बगैरे उदीम करणें तो.


७२. सामिलनामा- जातीनें आंगवण नाहीं सबब भाऊ उभा करणें त्यास लेहून देणें घेणें तो.


७३. सारांश- वाद्यावाद्यांचा कयास निवडून संभाविताचें मत देणें तो.


७४. साहित्यपत्र - नव्या अंमलदाराच्या मदतीकरितां दिलें तें.


७५. साक्षपत्र - साक्ष अगर गोही लिहून दिली तें.


७६. सोडचिट्टी–अंमल सोडणे त्याबद्दल लेहून देणें किंवा जप्ती करून सोडणें ती.


७७. इजिरीपत्रक - हजिरी घेणें तें.


७८. हप्तेबंदी - दरमुदत ऐवज घेणें त्याविषयीं लेहून घेणें ती.


७९. हरकीपत्र - न्यायांत खरा झाला त्यापासोन पैका घेणें त्यान्चें पत्र तें.


८०. हरदुमुसना जुमला ( मुजरा ? ) - चिट्टी गमावली ती नवीन करून घेणें त्यास.


८१. हुकुमीपत्र - कामगिरीवर रवाना करणें तें.


८२. हुकमो रोखा- हुकूम मोडला अगर सालाबाद शिरस्त्याप्रमाणें न वर्तला तरी मसालापत्र लिहिणें तो.


८३. हुज्जत पोत्यास ऐवज जमा केला त्याची पावती देणें ती.


८४. हुंडी-ऐवज देऊन देशावरावरी घेणें ती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या