नाद लागला की माणूस वेडा होतो ते एका नादासाठी आणि मग त्याचे परिणाम पाहून जग तोंडात बोटं घालून घेत. आता नाद कोणता लाऊन घ्यायचं हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून आहे.
![]() |
| Image source: internet |
एखादा नाद लागला की माणूस काय करू शकतो याची दोन उदाहरणे खाली दिली आहेत.
ऐन पावसाळ्याचे दिवस, प्रतापगड पायथ्याच्या गावातून बातमी येते की काही मोडी जुने कागद मिळाले आहेत आणि ती बातमी ऐकताच आपली सायकल काढून एक वेडा इतिहास प्रेमी तो कागद पाहायला आणि वाचायला निघतो. ते ही चक्क पुण्यातून. ही कोणती कवी कल्पना नाही तर सत्य आहे.
पटत नाही ना?
बरं अजून एक किस्सा सांगतो.
१९५० चा काळ, भायखळा स्टेशन परिसर, ईथ एक तरुण रोज डोक्यावरून कोथिंबीर आणतो, त्याच्या जुड्या बनवितो आणि मंडईत नेऊन विकतो. परत संध्याकाळच्या ट्रेन ने पुण्याला येतो. खरं पाहता यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. प्रत्येक जण उपजिविकेसाठी या गोष्टी करतो पण हा तरुण स्वतःच्या उपजिविकेसाठी नाही तर त्याने लिहलेले शिवचरित्र प्रकाशित करण्यासाठी पैसा उभा करता यावा म्हणून.
ते इतिहासकार म्हणजे बाबसाहेब पुरंदरे.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
| ऐतिहासिक साधने अभ्यासून त्यांनी शिवचरित्र लिहून काढलं, नाव दिलं राजा शिवछत्रपती. मराठी मनात ते इतकं रुजलं की पुढे लोकांनी त्याची पारायणे केली. ऐतिहासिक पुस्तकाची पारायणे व्हावीत असे हे एकमेव उदाहरण असेल. महाराष्ट्राच्या मातीने इतिहास घडवणारी पोरं जन्माला घातली पण त्याबरोबर त्यावर अभ्यास करणारी आणि घडलेला इतिहास आहे तसा त्यासोबत छेडछाड न करता जगासमोर मांडणारी अभ्यासक मंडळी सुद्धा. त्यापैकी एक म्हणजे बाबासाहेब. मागच्या तीन ते चार दशकात राजा शिवछत्रपती हा ग्रंथ वाचला नाही असा माणूस मिळणे मुश्किल. अहो, शिवाजी महाराज इतक्या सोप्या भाषेत त्यांनीच लिहावे आणि तितक्याच भावनिक शब्दात त्यांनीच सांगावे. बाबासाहेब यांनी २९ जुलै रोजी १०० व्या वर्षात पदार्पण केले. |
वन्ही तो चेतवावा । चेतविता चेततो।
या समर्थांच्या ओळींना ते सार्थ करतात. शिवाजी ही तीन अक्षर ऐकताच भावनिक होऊन इतिहास सांगायला सूरवात करतात तेही सर्व तारखा आणि तिथी यांचे तंतोतंत संदर्भ देत.
![]() |
| Image source: ShivMudrankan |
बाबासाहेबांचं नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे. २९ जुलै १९२२ रोजी सासवड येथे त्याचा जन्म झाला. त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या वडिलांचा मोठा हातभार होता. इतिहासाची आवड निर्माण झाली याचे श्रेय ते त्यांच्या वडिलांना देतात. २५ डिसेंबर १९५४ साली त्यांचे पाहिले व्याख्यान नागपुरात झाले आणि त्यानंतर शिव चरित्र कथन आज पर्यंत अव्याहत सुरू आहे. इतिहास संशोधक ग. ह. खरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिव चरित्राचा अभ्यास सुरू केला. अनेक दस्तावेज स्वतः हाताळून त्यांचा अभ्यास एक संशोधक म्हणून केला. संशोधनाच्या चौकटीत बसवून त्यांची पडताळणी केली आणि त्याच्या अनुषंगाने सर्वसामान्य माणसाला समजेल असे 'राजा शिवछञपती' नावाचे शिव चरित्र जगासमोर ठेवले. यात त्यांना अडचणी देखील खूप आल्या. पण शिवाजी या तीन शब्दावर अभ्यास करणारा व्यक्ती अडचणींना घाबरत असेल का? राजा शिवछत्रपती ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आणि त्यानंतर आचार्य अत्रे यांनी बाबसाहेबांवर अग्रलेख लिहला त्यामुळे पहिली आवृत्ती लगोलग खपली.
| Image source: Onkar Todkar |
आचार्य अत्रे म्हणतात
हे शिवचरित्र गद्य आहे की, काव्य आहे, इतिहास आहे की नाट्य आहे, याचा शब्दागणिक भ्रम पडतो. हे अमर शिवचरित्र कालिदासाच्या कल्पनेने आणि भवभूतीच्या भावनेने लिहिणारा एक महाकवी, हे अमर शिवनाट्य शेक्सपीअरच्या ज्वलंत भावनेने लिहिणारा महान नाटककार या महाराष्ट्रात जन्माला यावा हे केवढे मोठे भाग्य !
बाबासाहेबांनी 'जाणता राजा' हे महानाट्य उभं केलं. महानाट्य का म्हणायचे?
अहो, महानाट्यच ते कारण त्याचा रंगमंच इतकं मोठा आहे की ३०० लोक एकावेळी तिथं उभी राहू शकतात. अजून एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे एकमेव नाटक असेल ज्यात जिवंत हत्ती, घोडे आणि उंट रंगमंचावर असतात.
मग महानाट्य च झालं ना ते?
या महानाट्याचे आजवर १२०० हून जास्त प्रयोग झाले. ते प्रयोग फक्त भारतात च नाही तर अमेरिका व इग्लंड मध्ये देखील झाले. त्यांचे हे कष्ट पाहून सुमित्राराजे भोसले यांनी बाबासाहेबांना 'शिवशाहीर' अशी उपाधी दिली. 'स्वामी कार रणजित देसाई, डॉ. विजय भटकर, मृणाल गोरे यशवंतराव चव्हाण, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, 'मृत्युंजय'कार शिवाजीराव सावंत, सुधीर फडके, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, भारतरत्न लतादीदी, वसंतदादा पाटील, शंकरराव मोहिते-पाटील, गो. नी. दांडेकर, नरहर कुरुंदकर, पु. ल. देशपांडे, न. र. फाटक अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांनी बाबासाहेबांच्या तपश्चर्येचा वेळोवेळी गौरव केला. बाबासाहेबांना १९ ऑगस्ट २०१५ रोजी 'महाराष्ट्रभूषण पुरस्कार' प्रदान करण्यात आला. तसेच त्यांच्या कार्याचा गौरव 'पद्मविभूषण' पुस्काराने देखील झालेला आहे.
बाबासाहेबांविषयी शिवाजीराव भोसले म्हटले होते
बाबासाहेब ही व्यक्ती आहे की संस्था आहे हेच उमगत नाही. व्यक्ती म्हणावं तर तिचं कार्य महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. संस्था म्हणावं तर तिच्या कोठेही शाखा नाहीत. एका खांबावरती उभी असलेली ही वर्तमानकालीन द्वारका आहे. शाबास, शाहिरा शाबास! इतिहासानंसुद्धा तुला मुजरा करावा इतका मोठा माणूस तू ! या सत्त्वहीन, तत्त्वहीन जगात शिवचरित्राचा जागर करीत राहा. तुझ्या जागरणाला महाराष्ट्रातील सारी दैवतं जातीनं हजर राहतील आणि तुझ्या शिवकथेत न्हालेला हा महाराष्ट्र तेजस्वी इतिहासाची पुनरावृत्ती घडवील आणि खंडतुल्य अशा या प्रजासत्ताकास आनंदभुवनाचे ऐश्वर्य प्रदान करील. हे घडावं यासाठी हे इतिहासपुरुषा, शतायुषी हो!'
आणि शिवाजीरावांचे हेच शब्द खरे होताना महाराष्ट्र आज बघत आहे.
बाबासाहेबांनी आज १०० व्या वर्षात पदार्पण केले, खूप खूप शुभेच्छा!
आमचे मित्र श्रीमान राम वाघोले यांनी बाबासाहेबांना लिहलेले मोडी लिपीतील पत्र
![]() |
| Image source: राम वाघोले |




0 टिप्पण्या
Thanks for Comment and suggestions