Header Ads Widget

Responsive Advertisement

शिल्प शास्त्रातील नागाचे महत्व | मंदिर बांधकामांसाठी कोणता काळ योग्य आहे हे ठरवण्यासाठी देखील नागाचा वापर होतो, कसं ते वाचा

हिंदुधर्मात भुतदयेवर भर दिलेला दिसतो. इथ सर्व प्राण्यांना योग्य ती वागणूक दिली आहे. गावागावात आपणाला नागाचे शिल्प दिसून येते. मंदिराचा आवार असो किंवा गावातील पार एखादे तरी नागशिल्प असतेच. महादेवाने नागाला आभूषण म्हणून धारण केले आहे तर विष्णूने त्याची शय्या बनवली आहे तसेच गणपतीने नागाला पोटाभोवती गुंडाळले आहे. देवतांच्या विविध मूर्तीमध्ये नाग दिसतो. 

Image source: Onkar Todkar

मंदिरावर शक्यतो तीन, पाच किंवा सात फण्यांचा नाग दिसतो. नाग जोडी असेल तर त्याला नागमाता म्हणतात. मंदिर बांधकामात भैरवयंत्र, योगिनीयंत्र, नागबंध असे काही शास्त्र वापरले जातात. 

मंदिर बांधकामांसाठी कोणता काळ योग्य आहे हे ठरवण्यासाठी देखील नागाचा वापर होतो.


बांधकामाचा पाया खणण्यासाठी खालील संकेत देण्यात आला आहे

नागवास्तुं समालोक्य कुर्यात् खातविधिं सुधीः ।
पाषाणान्तं जलान्तं वा ततः कूर्म निवेशयेत् ॥

नागवास्तुची स्थिती बघून त्याप्रमाणे शहाण्याने पाया खणण्यास सुरूवात करावी. पाया मजबूत पाषाणापर्यंत किंवा भूगर्भान्तर्गत पाण्याच्या पातळी पर्यंत खोल खणावा व तेथे कूर्माची स्थापना करावी.

नागराजाने पृथ्वी डोक्यावर तोलून धरली आहे अशी कल्पना आहे. तो स्वतःभोवती एका वर्षात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. दर तीन महिन्यात एका दिशेकडे त्याचे तोंड असते अशा रीतीने वर्षभरांत चारी मुख्य
दिशांना त्याचे तोंड असते.
Image source: Onkar Todkar


भाद्रपद, अश्विन व कार्तिक महिन्यांत नागाचे डोके पूर्व दिशेकडे असते. या तिमाहीच्या पहिल्यादिवशी नागाचे डोके बरोबर ईशान्य दिशेकडे असते व शेवटच्या दिवशी ते आग्नेय दिशेकडे असते. अशा
रीतीने नागाचे डोके एका दिवसाला एक अंश असे प्रदक्षिणा क्रमाने फिरते.
Image source: Onkar Todkar

शिल्पप्रकाश नुसार पूर्व दिशेकडील तोरण सर्वसाधारणपणे यश देणारे असते. वास्तुची पूजा इत्यादी श्रावण तसेच भाद्रपदात करू नये. मार्गशीर्ष व पौष महिन्यात नागाचे डोके दक्षिणेकडे असते. हा शाखाच्या मताने यथायोग्य शुभ काल असतो. त्यावेळी नागबन्धाला अनुसरून शंकूची स्थापना करणे उत्तम असते. त्यानंतर प्रासादाच्या समितीची स्थापना करण्यासाठी (पायासाठी) खड्डा खोदावा.
नाग आपल्या शरीराने मध्यबिंदूपाशी २७० अंशांत फिरलेला असतो व ९० अंशांचा भाग सोडून दिलेला असतो.
शिल्पसारणींत या नागाला गृह-नाग म्हटले आहे, कारण देवालयाच्या दरवाजाची दिशा त्याच्या (मुखाच्या) स्थानावरून निश्चित केली जाते. देवालय त्याच्या छातीपाशी असून देवालयाची लांबी त्याच्या
शेपटीच्या दिशेकडे असते, त्याचे डोके ज्या दिशेला असेल त्या दिशेला दरवाजा ठेवतात.
या सापास काल-सर्प देखील म्हणतात. त्यास ३६० हाडे (दिवस व रात्री), ६ अवयव (ऋतू), १२ वळसे (महिने) असतात. त्याच्या शरीराचा वरचा गडद रंगाचा भाग रात्र व खालचा फिक्या रंगाचा भाग
दिवस दर्शवितात. अशा रीतीने एक वर्षाचा कालावधी या नागाने दर्शविला जातो.

© ओंकार खंडोजी तोडकर

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

Thanks for Comment and suggestions