संसार, विषय, प्राणी व सृष्टी ज्यात लय पावतात व त्यातूनच पुन्हा सृष्टी निर्माण होते म्हणून त्यास लिंग म्हणतात.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
सृष्टी जन्माच्या वेळी शांती तत्वाचा उद्भव झाला , त्याच्या पासून शक्ती व शक्ती पासून नाद जन्मला व त्यातून बिंदू. ईश्वर, महेश्वर, नाद आणि बिंदू यांच्या मिश्रणाला शिव म्हणतात.
शिवलिंग म्हटलं की नजरेसमोर येत ते एक पीठ (पूजेचे पाणी जाण्यासाठी असणारी सोय) आणि त्यावर उभट गोल शाळूंका.
पण शिवलिंग घडवण्यासाठी काही नियम आहेत. मग तो दगड निवडण्या पासून ते पूजा कशी करावी इथ पर्यंत वेगवेगळ्या गोष्टी पहाव्या लागतात.
शिवलिंगाचा आकार
प्रथमदर्शनी आपणाला शिवलिंग फक्त उभट गोलाकार दिसते पण त्याखाली अजून दोन भाग असतात.
ब्रम्हांश श्चतुरस्त्रोधो मध्ये श्टस्त्रस्तू वैष्णव।पुजाभाग सुवृत्तः स्यात पिठोर्धव शंकरास्य च।।
फोटोत दाखवल्याप्रमाणे शिवलिंगाचा सर्वात खालचा भाग चौकोनी असतो त्याला ब्रम्हभाग म्हणतात. मधला भाग अष्टकोनी असतो त्याला विष्णूचा अंश म्हणतात. सर्वात वरचा भाग वर्तुळाकार असतो ज्याला शंकराचा अंश म्हणतात. आणि हाच भाग आपणाला दिसतो बाकी दोन भाग पिठात असतात.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
आता या भागांची मापे पण ठरलेली आहेत त्याचा उहापोह नंतर करू.
शिवलिंगाचे स्वरूप
धातु लिंग
सोने, चांदी, तांबे, कासा, पितळ, कलई, शिसे आणि लोखंड या आठ धातु पासून शिवलिंग बनवलं जातं. अशा लिंगाला चल लिंग पण म्हणतात.
मनोहर,श्रीमुख, रुद्रतेज, महोत्सव, आनंद, सुवस्त्राश्य, स्त्रीपुंज, नंदिवर्धन अशी धातु लिंगाची आठ नावे आहेत. मिश्र धातूचे लिंग कधीच बनवीत नाहीत म्हणजेच लिंग सोन्याचे बनविले तर पीठ पण सोन्याचे च बनवावे.
काष्ठ लिंग ( लाकडापासून बनवलेले लिंग)
शिसव,अशोक,शिरीष,खैर,अर्जुन, चंदन,कडुनिंब,रक्तचंदन,देवदार,पारिजातक अशा झाडांपासून लिंग बनवतात.
मकरेंद,मांगल्य, पुष्प, सिध्दार्थक, दंड,प्रौरव, काम्य,पुष्पक, फलोदभव अशी काष्ठ लिंगाची नऊ नावे आहेत.
पाषाण लिंग
श्रीभव, उद्भव, भय, भयहृत, पाशहरण, पापहंता, तेज, महातेज, परापर,महेश्वर, शेखर, शिव, शांत, मनोहृदकर, रुद्रतेज, सदात्मज्ञ, वामदेव, अघोर, ईश्वर, तत्पुरूष, ईशान,मृत्युंजय, विजय, किर्णाक्ष, महोरस्त्र, श्रीकंठ, मुनिवर्धन, पुंडरिक, सुवकत्र, उमातेज,विश्वेश्वर,त्रिनेत्र, त्र्यंबक, महाकाल अशी पाषाण लिंगाची ३४ नावे आहेत.
बाळ, युवती, वृद्धा, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी असे पाषाणाचे प्रकार त्याच्यावर आघात केल्यानंतर होणाऱ्या नादातून ठरतात.
बारीक आवाज असणारी शिळा बाळ असते तर, घंटे प्रमाणे आवाज असंती शिळा युवती असते.
बद्द असा आवाज होणारी शिळा वृद्धा तर खणखणीत आवाज असणारी पुल्लिंगी शिळा असते.
मंजुळ आवाज असणारी स्त्रीलिंगी, खरखरीत, रुक्ष, हिन स्वर असणारी नपुसंक लिंगी.
मुखलिंग:-
मुखलिंग हे एकमुखी, त्रिमुखी, चतुर्मुखी किंवा पंचमुखी असतात.
एकमुखी लिंगात मुख हे समोर असते तर त्रिमुखी लिंगात तीन बाजूला मुख असते तर पाठीमागील बाजूस मुख दाखवत नाहीत. या प्रकारच्या काही शिवलिंगात ब्रम्हा आणि विष्णूचा पण चेहरा दाखवितात.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
चतुर्मुख लिंगावर चारही बाजूला मुख कोरलेले असते. या चारही मुखांना खालील प्रमाणे नावे आहेत.
सद्यो वामं तथा घोर पुरुष च चतुर्थकम ।
अर्थ:
पहिलं नाव सद्य, दुसरं वाम तिसरं नाव घोर तर चौथ नाव तत्पुरूष.
पंचमुखलिंग
सदरचे लिंग हे सातारा जिल्ह्यातील परळी गावात आहे. गावाच्या बाहेर पुरातन महादेव मंदिरासमोर हे लिंग असून त्यावर पाच मुख कोरली आहेत.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
शिवपुराणात महादेवाला पाच मुख असल्याचे म्हटले आहे. सद्योजत, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान अशी या पाच मुखांची नावे आहेत. महादेव म्हणतात की ओंकार 'ॐ' ही त्यांची उत्पत्ती आहे. त्यांच्या उत्तर मुखातून अकार, पश्चिम मुखातून उकार, दक्षिण मुखातून मकार, पुर्व मुखातून बिंदु आणि मध्य मुखातून नाद प्रकट झाला. अशा पाच अवयवांपासून 'ॐ' ची निर्मिती झाली.




0 टिप्पण्या
Thanks for Comment and suggestions