विष्णूच्या दहा अवतारातील कृष्ण हा एक अवतार आहे.
गीतेतील श्लोकानुसार ज्या ज्या वेळी धर्म संकटात असेल त्या त्या वेळी भगवान विष्णू अवतार घेऊन धर्माचे रक्षण करतील आणि त्यानुसार दशावताराचा उल्लेख मिळतो तो पुढीलप्रमाणे
मत्स्य कूर्मो वराहश्च नारसिंहोऽथ वामनः।
रामो रामश्च कृष्णश्च बुद्धः कल्किश्च ते दशा:॥
२) कुर्म
३) वराह
४) नृसिंह
५) वामन
६) राम
७) परशुराम
८) कृष्ण
९) बुद्ध
१०) कल्की
ही अवतारांची यादी काही ठिकाणी वेगळी येते. यातील बुद्ध, परशुराम, बलराम ही नावे काही एक फरकाने बदललेली दिसतात. हे दहा अवतार सोडून भगवान विष्णू यांनी अजूनही बरेच अवतार घेतलेले दिसतात जसे की मोहिनी, हयग्रिव इत्यादी.
द्वापार युगाच्या शेवटी मथुरेमध्ये ययाती वंशातील राजा राज्य करत होता. त्याला असणाऱ्या पुत्रात सर्वात मोठा होता कंस. कंसाने आपल्या पित्याला कैद केले आणि स्वतः मथुरेचा राजा झाला. त्याचे आपल्या बहिणीवर म्हणजे देवकिवर खूप जास्त प्रेम होते. पण एक आकाशवाणी झाली ज्याप्रमाणे देवकीचा आठवा पुत्र कंसाची हत्या करेल. या आकाशवाणी नंतर कंसाने देवकी आणि वसुदेव यांना कैद करून ठेवले व आठव्या पुत्राच्या जन्माची वाट पाहू लागला. आता पर्यंत देवकी आणि वसुदेव यांना ७ पुत्र झाले ते कंसाने मारून टाकले. भाद्रपद महिना, कृष्ण पक्षातील अष्टमी या दिवशी देवकी आणि वसुदेव यांना आठवा पुत्र झाला. आठवा पुत्र जन्मला तेंव्हा त्याला एका टोपलीत घेऊन वसुदेव कारागृहातून बाहेर पडले. त्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाची लीला अशी होती की वसुदेव बाहेर जात असताना सर्व पहारेकरी गाढ झोपी गेले आणि कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले. भर पावसात यमुना पार करून वसुदेव गोकुळात पोचले व त्यांनी यशोदेच्या घरी आपल्या बाळाला ठेवले. कंसाला याची बातमी लागली आणि तो बाळाला ठार मारायला निघाला पण तेथे एक मुलगी दिसली जीला ठार मारताना तिने आदिमायेचे रूप घेऊन सांगितले की तुझं काळ गोकुळात आहे. यानंतर कंसाने आपल्याकडे असणारे सर्व मायावी राक्षस जसे की पुतना, शटकासुर, तृणावर्त, इत्यादींना गोकुळात पाठवून कृष्णाला मारायचा प्रयत्न केला पण बालकृष्णाने सर्वांचा वध करून उद्धार केला.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
![]() |
| Image source: Onkar Todkar |
कृष्णाला घेऊन जाताना वसुदेव
पुतना वध
कृष्णाच्या जन्माच्या सहाव्या दिवशी म्हणजे चतुर्थीला पुतना नावाच्या मायावी राक्षसीला कंसाने पाठविले. तिने खूप सुंदर स्त्रीचे रूप धारण केले आणि कृष्णाची मावशी सांगून तिने गोकुळात यशोदेच्या घरी प्रवेश केला. तिथे झोपलेल्या कृष्णाला हातात घेऊन तिने विषारी दूध पाजायला सुरवात केली. पण काही क्षणातच पुतना वेदनेने कळवळून ओरडू लागली. तिच्या शरीरातील सर्व सत्व निघून गेले आणि राक्षसीचे फक्त अस्थिपंजर शरीर राहिले.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
शकटासुर वध
आठव्या पुत्राचा वधाची मालिका कंसाने सुरूच ठेवली होती. पुतनेच्या वधानंतर कंसाने शकटासुर नावाच्या राक्षसाला पाठविले जो नेहमी छकड्यात प्रवेश करून लोकांना मारीत असे. यशोदेने कृष्णाला एका छकड्याखाली झोपविले होते व ती अंघोळीला गेली होती. शकटासुराने त्या छकड्यात प्रवेश करून कृष्णाला मारणार इतक्यात कृष्णाने आपल्या एका लाथेने छकड्याला आकाशात फेकले. जेंव्हा छकडा खाली पडला तेंव्हा शकटासुर मरून पडला होता.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
बकासुर वध
कंसाने बकासुर नावाच्या राक्षसाला कृष्ण वधाची कामगिरी सोपवली. त्याने बगळ्याचे रूप धारण केले. कृष्ण जिथे खेळत होता तिथे एका तलावात तो बसुन राहीला. बकासुराचे रूप पाहून कृष्णाच्या मित्रांनी धास्ती घेतली पण कृष्णाने त्याचं वध केला.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
वृषभासुर वध
यालाच अरिष्टासुर देखील म्हटलं जात. वृषभासुराने एका बैलाचे रूप घेतले आणि तो गोकुळातील गाईत मिसळला. त्याला पाहून गाई घाबरल्या आणि पळू लागल्या. कृष्णाने त्याला ओळखलं. वृषभासुर कृष्णाला मारायला त्याच्या अंगावर गेला पण कृष्णाने त्याचं वध केला.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
कागासुर वध
कागासुर नावाच्या राक्षसाने कावळ्याचे रूप धारण केले. तो गोकुळात येऊन पोचला. आपल्या चोचीने कृष्णाचे डोळे काढावे या हेतूने तो कृष्णाच्या पाळण्यावर जाऊन बसला पण कृष्णाने त्याला आंपल्या कोमल हातानी पकडले तसा तो तडफडू लागला. तडफडत तो कंसाकडे गेला व हकीकत सांगून मृत्यमुखी पडला.






0 टिप्पण्या
Thanks for Comment and suggestions