Header Ads Widget

Responsive Advertisement

नंदी बैलवाले : महाराष्ट्राच्या परंपरेतील अविभाज्य घटक

नंदी बैलवाले : महाराष्ट्राच्या परंपरेतील अविभाज्य घटक
 

 

अहो महादेवाचा ह्यो नंदी |
व्हता राहत कैलासामंदी ||
आला की गावामांदी |
मागाया धन धान्याची चंदी ||

 

नंदी-नंदीबैलवाले-महाराष्ट्र-Maharashtra-nandi-nandibail २२
Photo source: https://historicano2.blogspot.com


नंदीबैल वाल्यांचे खेळ पाहण्यासाठी खालील window वर क्लिक करा




कृपया आपले चॅनल subscribe करायला विसरू नका

महाराष्ट्रातील मनोरंजनाची काही प्रमुख साधने अशी- कोल्हाटी,नंदीवाले,अस्वलवाले,बहूरूपी,वासुदेव,पिंगळे,हिजडा,भारुड व तमाशा. पैकी नंदीवाले गावोगावी जाऊन लोकांची करमणूक करतात व त्यातून थोड फार अर्थार्जन अथवा भिक्षेच्या रुपात धान्य घेतात. यांचे खेळ पण अजब असतात जसे माणसाच्या मांडीवर नंदी पाय देतो, नंदी बरोबर कुस्ती, माणसाच्या पोटावर चारी पाय देऊन नंदीला उभे करणे, मान हलवून होय नाय करणे.

खेळ चालू असताना कधी नंदी रुसून बाजूला जाऊन उभा राहतो मग नंदिवाला त्याची समजूत काढून त्याला घेऊन येतो, नंदिशी तो कुस्ती खेळतो आणि त्यात तो पडतो.
यांचा लोकप्रिय खेळ म्हणजे गुबु गुबू च्या आवाजावर भाकीत करणे.

औंदा पाऊस पडलं का? 
पाटलिण बाईला सूनमुख दिसलं का? 
औंदा पाळणा हलल का?

असे काही प्रश्न विचारले जातात आणि त्यावर नंदी आपली मान हलवून होकारार्थी अथवा नकारार्थी संकेत देतो.
शेवटी मग विचारलं जातं "सकाळपासून उपाशी हाय का?" 
तर नंदी होकारार्थी मान हलवतो आणि नंदी वालाच पुढे विचारतो "चहा पिणारे का? बिस्कीट खाणारा का?" नंदी नकार देतो आणि  "गहू,ज्वारी,कपडे पाहिजेत का?" यावेळी मात्र नंदी मान पण हलवतो आणि दोन पाऊले पुढं येऊन उजवा पाय पुढं करून उभा राहतो.



नंदी-नंदीबैलवाले-महाराष्ट्र-Maharashtra-nandi-nandibail ३३
Photo source: https://historicano2.blogspot.com


                                  हा नंदी पण अगदी धडधाकट पण तितक्याच गोंडस चेहऱ्याचा,भलीमोठी शिंगे असणारा असतो. नंदीच्या गळ्यात घंट्यांची माळ ज्याला घागर माळ म्हणतात ती असते, पायात झांजरे, शिंगांना पितळी शेंब्या, रंगबेरंगी कपड्याचे गोंडे,पाठीवर झुल आणि रंगीत कापड, कपाळावर गणपती किंवा मारुती किंवा महादेवाचा पितळी टाक असतो. नंदीबैलवाल्यांची वेशभूषा पण ठरलेली असते ती म्हणजे अंगरखा, त्यावर कोट, कमरेला शेला आणि डोक्यावर गुलाबी फेटा, कपाळावर टिळा.

                             तर अस हे एक मनोरंजनाच आणि काही लोकांसाठी पोटाचा खड्डा भरण्याच एक साधन आहे. आजही लहान सहान गावात पहाटे पहाटे पिंगळा येतो, वासुदेव येतो. या आपल्या परंपरा आहेत यांची कदर केली पाहिजे. ओंजळ भर धान्यात हे लोक समाधानी होतात त्यामुळं तितकं तर आपण करू शकतो. आणि कधी असे नंदीबैलवाले दिसले तर नंदीच तोंड नक्की बघा त्याच्या इतका गोंडस प्राणी तोच 🤩



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Thanks for Comment and suggestions